गडाच्या तटबंदीजवळ अवैधरित्या उत्खननाला विरोध
वेंगुर्ला येथील संरक्षित स्मारक असलेल्या तालुक्यातील यशवंतगडाच्या तटबंदीला लागून अवैधरित्या करण्यात आलेले उत्खनन आणि आर्.सी.सी. बांधकाम यांना उत्तरदायी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील शिवप्रेमी तथा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण प्रांताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर आणि भूषण मांजरेकर हे २० फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
‘यशवंतगडाजवळ झालेले अवैध उत्खनन आणि बांधकाम याकडे रेडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तसेच वेंगुर्ला तहसीलदार, शिरोडा मंडळ अधिकारी, रेडीचे तलाठी, कोतवाल, साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग (रत्नागिरी) यांनी दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई केली नाही. याउलट अनधिकृत बांधकामापासून गडाचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न करणार्या शिवप्रेमींना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून नोटीस बजावण्यात आली, हे दुर्दैवी आहे. आमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होण्याची शक्यता असल्याने आम्हाला संरक्षण द्यावे, असे निवेदन पोलिसांना दिल्याचे रेडकर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !