|
नवी देहली – ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ मार्च या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत चालू होती. त्रिपुरा आणि नागालँड येथे भाजपने सत्ता राखली आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे, तर नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप यांच्या युतीने १९ जागांवर विजय मिळवला आहे, तर १७ ठिकाणी ती आघाडीवर असल्याने तेथे युतीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्रिपुरामध्ये भाजपने ३१ ही बहुमताची संख्या प्राप्त केली आहे, तर माकप आणि टिपरा मोथा पार्टी ११ जागांवर पुढे आहे.
मेघालय – ६० , एन्.पी.पी. – २५, भाजप – ३ , काँग्रेस – ५ , तृणमूल काँग्रेस – ५, टीपीपी – ६, इतर – १६
नागालँड – ६०, भाजप – १२, एन्.डी.पी.पी. – २५ ,काँग्रेस – ०, एन्पीपी – ५, इतर – १८
त्रिपुरा – ६०, भाजप – ३३ ,टिपरा मोथा पार्टी – १३, माकप – ११ ,काँग्रेस – ३