विशेष समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होणार !

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !

नवी देहली – मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच ‘विरोधी पक्षनेते नसतील तर, तेव्हा संसदेतील सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाचे नेते या समितीचे सदस्य असतील’, असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर युक्तीवाद झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.