स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍मृती प्रतिष्‍ठानचे श्री. विद्याधरपंत नारगोलकर यांचा गड-दुर्गांच्‍या रक्षणासाठी कार्य करणार्‍यांवर असलेला विश्‍वास !

श्री. विद्याधरपंत नारगोलकर

३ मार्चला असणार्‍या महामोर्च्‍याच्‍या आयोजनाच्‍या संदर्भात आयोजित केलेल्‍या बैठकीत स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍मृती प्रतिष्‍ठानचे श्री. विद्याधरपंत नारगोलकर हे उपस्‍थित होते. त्‍यांना मार्गदर्शन करण्‍याची विनंती करण्‍यात आली. तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘मी कुणाला काय मार्गदर्शन करणार ? मी राष्‍ट्ररक्षणाच्‍या मार्गावर जाणार्‍यांचे दर्शन घेण्‍यासाठी आलो आहे. श्री. सुनील घनवट यांच्‍यासारखे मार्गदर्शक आणि समस्‍त हिंदु बांधव सामाजिक संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. रवी पडवळ यांच्‍यासारखा सूर्य आपल्‍या समवेत असल्‍यावर आपल्‍याला तळपायला वेळ लागणार नाही !’’