(म्हणे) ‘भारतात सर्व जण उपाशी मरत आहेत, तू तेथे परत का जात नाहीस ?’- अमेरिकी लेखिका एन्. कोल्टर

ही आहे अमेरिकी लोकांची मानसिकता ! असे अमेरिकी भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा कांगावा करत असतात !

यालाच म्हणायचे आहे का ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्था ?

सत्तेवर पक्ष कोणत्याही विचारांचा आला, तरी प्रशासकीय व्यवस्था जोवर ‘सेक्युलर’च्या नावाखाली हिंदुविरोधी असेल, तोवर हिंदूंना सावत्र मुलाप्रमाणे वागवणार.

राजस्थानमधील पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवर एन्.आय.ए.च्या धाडी !

कोटा येथे ३, तर जयपूर, सवाई माधोपूर, बुंदी आणि भिलवाडा येथे प्रत्येकी एका कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकण्यात आली. ही कारवाई गोपनीय ठेवण्यात आली असून काही कागदपत्रे आणि संदिग्ध साहित्यही कह्यात घेण्यात आले आहे.

मारहाणीचा गुन्हा नोंद असलेल्या बांगलादेशी घुसखोराचे २७ वर्षांपासून मुंबईत अवैध वास्तव्य !

२७ वर्षांपासून अवैधपणे भारतात रहाणार्‍या घुसखोराविषयी माहिती नसणे, हे गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे ४०० हून अधिक प्रदर्शन कक्ष !

सनातनच्या या ग्रंथप्रदर्शनाला विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पहार्‍यासाठी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनीही ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली.

नागपूर-मुंबई दुरांतोला आता १५ थर्ड एसी कोच आणि २ स्लीपर कोच ! : १५ जूनपासून निर्णयाची कार्यवाही !

गाडी क्रमांक १२२९० नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये हा पालट १५ जूनपासून लागू होणार आहे. गाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर एक्सप्रेसमध्ये हा पालट १६ जूनपासून लागू होणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहनचा (एन्.एम्.एम्.टी.चा) ९ लाख ४९ सहस्र रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर !     

वर्ष २०२३-२४ च्या मूळ अर्थसंकल्पामध्ये आरंभीच्या शिलकेसह एकूण महसूली आणि भांडवली ५३६ कोटी ६६ लाख १३ सहस्र रुपये जमा अन् ५३६ कोटी ५६ लाख ६४ सहस्र रुपये इतका खर्च होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सांगली येथे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी !

सांगली महापालिकेसमोरील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौक येथे १७ फेब्रुवारीला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची १४० वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

पंचमहाभूत लोकोत्सवासाठी कोल्हापूर परिवहनची २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत विनामूल्य बससेवा !

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधी होत असलेल्या पंचहाभूत लोकोत्सवासाठी कोल्हापूर परिवहन (के.एम्.टी.) सकाळी ६ ते रात्री ११ या कालावधीत विनामूल्य बससेवा देणार आहे.

पुणे येथे सनातन संस्थेकडून श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन !

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त १३ फेब्रुवारी या दिवशी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.