नवी मुंबई महानगरपालिका परिवहनचा (एन्.एम्.एम्.टी.चा) ९ लाख ४९ सहस्र रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर !     

नवी मुंबई, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – एन्.एम्.एम्.टी.चे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांना एन्.एम्.एम्.टी.चा वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ९ लाख ४९ सहस्र रुपयांचा मूळ शिलकी अर्थसंकल्प सादर केला आणि वर्ष २०२२-२३ चा ४१६ कोटी ६३ लाख ९० सहस्र रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला.


त्यानंतर आयुक्तांनी तो संमत केल्याचे घोषित केले. वर्ष २०२३-२४ च्या मूळ अर्थसंकल्पामध्ये आरंभीच्या शिलकेसह एकूण महसूली आणि भांडवली ५३६ कोटी ६६ लाख १३ सहस्र रुपये जमा अन् ५३६ कोटी ५६ लाख ६४ सहस्र रुपये इतका खर्च होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.