कोल्हापूर – २० ते २६ फेब्रुवारी या कालावधी होत असलेल्या पंचहाभूत लोकोत्सवासाठी कोल्हापूर परिवहन (के.एम्.टी.) सकाळी ६ ते रात्री ११ या कालावधीत विनामूल्य बससेवा देणार आहे. या सर्व बसेस गंगावेस येथून सुटतील आणि परत येतील, तरी या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
१. पहिला मार्ग (जातांना) : गंगावेस – छत्रपती शिवाजी महाराज चौक – बसस्थानक – ताराराणी चौक – ओपल हॉटेल – शिवाजी विद्यापीठ – शाहू नाका – कणेरी मठ फाटा – वीजवितरण कार्यालयापासून कार्यक्रम स्थळाजवळ.
२. दुसरा मार्ग (जातांना) : गंगावेस – छत्रपती शिवाजी महाराज चौक – उमा टॉकीज – रेल्वे फाटक – राजारामपुरी – सायबर इन्स्टिट्यूट – शिवाजी विद्यापीठ – शाहू नाका – कणेरी मठ फाटा – वीजवितरण कार्यालयापासून कार्यक्रम स्थळाजवळ.
३. येतांनाचा मार्ग : कार्यक्रम स्थळावरून येतांना एकेरी मार्ग असलेने सर्व बसेस – कंदलगाव – कंदलगाव नाका – रिंग रोड ते शांतीनिकेतन – शिवाजी विद्यापीठ – ओपल हॉटेल – ताराराणी चौक – बसस्थानक – रेल्वेस्थानक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – गंगावेसपर्यंत येतील.