राजस्थानमधील पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवर एन्.आय.ए.च्या धाडी !

अनेक कार्यकर्त्यांना अटक

जयपूर (राजस्थान) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) कार्यकर्त्यांच्या ७ ठिकाणांवर धाडी टाकल्या आणि काही जणांना अटक केली. जयपूर, बुंदी, सवाई माधोपूर, कोटा आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली.

कोटा येथे ३, तर जयपूर, सवाई माधोपूर, बुंदी आणि भिलवाडा येथे प्रत्येकी एका कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकण्यात आली. ही कारवाई गोपनीय ठेवण्यात आली असून काही कागदपत्रे आणि संदिग्ध साहित्यही कह्यात घेण्यात आले आहे.