धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांना साहाय्य केल्याप्रकरणी नाशिकमधील पोलीस अधिकार्‍यांची होणार चौकशी !

अशा समाजद्रोही अधिकार्‍यांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? स्थानांतरित ठिकाणीही हे पोलीस हेच गुन्हे करणार नाहीत का ? अशांचे त्वरित निलंबन करायला हवे ! तसेच त्यांचा कार्यकाळ का वाढवला गेला ?, याचीही चौकशी व्हायला पाहिजे !

कोकणात खनिजावर आधारित उद्योग चालू करण्याविषयी धोरण ठरवणार !

‘आतापर्यंत कोकणात जे प्रकल्प आले, ते रासायनिक आणि पर्यावरणाचा र्‍हास करणारे उद्योग आले. त्यामुळे अशा उद्योगांना येथे विरोध होतो; विदर्भाप्रमाणे कोकणात अनेक प्रकारची खनिजे आहेत. त्यामुळे यावर आधारित उद्योग कोकणात येतील का ?

सरकारच्या विरोधात विरोधकांचे आंदोलन !

या वेळी विरोधकांनी हातात एक एक संत्रे घेतले होते. या वेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘त्यागपत्र द्या त्यागपत्र द्या, अब्दुल सत्तार त्यागपत्र द्या’, ‘शेतकरी उपाशी, मंत्री आहे तुपाशी’, ‘धानाला बोनस मिळालाच पाहिजे’, ‘कापूस, संत्रे, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन या पिकांना भाव मिळालाच पाहिजे’, या अशा घोषणा दिल्या.

धाराशिव नगरपरिषदेच्या अंतर्गत ‘बायोमायनिंग’च्या कामामध्ये अपव्यवहार करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करणार ! – मंत्री उदय सामंत

धाराशिव नगरपरिषदेच्या अंतर्गत बायोमायनिंगच्या कामामध्ये अपव्यहार करणार्‍या दोषींवर कठोर कारवाईची मागणी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केली.

अमेरिकेमध्ये ‘बाँब’ चक्रीवादळामुळे मृतांची संख्या ६० हून अधिक

अमेरिकेत ‘बाँब’ चक्रीवादळामुळे मृतांची संख्या ६० हून अधिक झाली आहे. न्यूयॉर्क शहरात चक्रीवादळामुळे सर्वाधिक म्हणजे २८ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. बर्फात गाडलेल्या वाहनांमध्ये अनेक जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

(म्हणे) ‘हिंदूंना देशातून हाकला, त्यांना नोकरीवरून काढा, भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घाला !’

अल् कायदाचे अस्तित्व आता नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. अशा वेळी ते टिकवण्यासाठी हिंदूंच्या नावाने मुसलमानांना भडकावण्याचा प्रयत्न अल् कायदा करत आहे; मात्र इस्लामी देश आणि मुसलमान त्याला भीक घालणार नाही, हेही तितेकच खरे आहे; कारण असे करणे त्यांच्यासाठी तोट्याचेच आहे !

ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयी जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आमदार छगन भुजबळ यांनी ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयीचे सूत्र लक्षवेधी सूचनेच्या वेळी सभागृहात उपस्थित केले होते. 

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन ७०० बसगाड्या घेण्याची प्रक्रिया चालू ! – शंभूराज देसाई, मंत्री

अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नात दिली. सदस्य राजेश राठोड यांनी हा प्रश्न विचारला होता.

नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने संमत !

केंद्रशासनाच्या लोकपाल कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा करण्यासाठीचे लोकायुक्त विधेयक २८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. यापूर्वीच्या कायद्यामध्ये पालट करून नव्या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाचाही समावेश कण्याची तरतूद असणार आहे.