न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत ‘बाँब’ चक्रीवादळामुळे मृतांची संख्या ६० हून अधिक झाली आहे. न्यूयॉर्क शहरात चक्रीवादळामुळे सर्वाधिक म्हणजे २८ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. बर्फात गाडलेल्या वाहनांमध्ये अनेक जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. प्रतिकुल हवामानामुळे गेल्या २४ घंट्यांत ३ सहस्रांहून अधिक विमान उड्डाणे रहित करण्यात आली आहेत, तर ३ सहस्र ८०९ विमानांनी उशिराने उड्डाणे भरली. अमेरिकेत चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. २६ डिसेंबर या दिवशी नारायण मुद्दना (४९ वर्षे), गोकुल मेडिसेठी (४७ वर्षे) आणि हरिथा मुद्दन्ना हे ३ भारतीय अमेरिकेतील अॅरिझोना येथील गोठलेल्या तळ्यावरून चालतांना बर्फाच्या पृष्ठभागाला तडा गेला. त्यामुळे सर्वजण तळ्यात बुडून मृत्यूमुखी पडले.
सौजन्य लेटेस्टली