सरकारच्या विरोधात विरोधकांचे आंदोलन !

हिवाळी अधिवेशन २०२२

‘दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर..’, ‘नागपूरची संत्री भ्रष्टाचारी मंत्री..’, ‘संत्री आहेत गोल, सरकारचा वाजवा ढोल..’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन

नागपूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – ‘दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर..’, ‘नागपूरची संत्री भ्रष्टाचारी मंत्री..’, ‘संत्री आहेत गोल, सरकारचा वाजवा ढोल..’ अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीतील आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर २८ डिसेंबर या दिवशी आंदोलन केले. या वेळी विरोधकांनी हातात एक एक संत्रे घेतले होते. या वेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘त्यागपत्र द्या त्यागपत्र द्या, अब्दुल सत्तार त्यागपत्र द्या’, ‘शेतकरी उपाशी, मंत्री आहे तुपाशी’, ‘धानाला बोनस मिळालाच पाहिजे’, ‘कापूस, संत्रे, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन या पिकांना भाव मिळालाच पाहिजे’, या अशा घोषणा दिल्या. या आंदोलनाच्या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, रोहित पवार, सुनील केदार, विकास ठाकरे, किरण लहामटे, भास्कर जाधव आदि उपस्थित होते.