झारखंड येथील उच्चशिक्षित प्रिया हिने भावपूर्ण स्थितीत केला श्रीकृष्णाशी विवाह !

प्रतिकात्मक छायाचित्र

झारखंड – येथील उच्चशिक्षित प्रिया या युवतीने श्रीकृष्णाशी विवाह केला आहे. त्यासाठी तिने १४ वर्षे तिच्या आर्य समाजी कुटुंबाशी संघर्ष केला. तिला मारण्याची धमकीही देण्यात आली होती. तिचे गुरु आचार्य श्री गौरवकृष्ण गोस्वामीजी यांनी तिला श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली आहे. परम गुरु स्वामी श्री हरिदासजी महाराज यांनी तिला श्रीकृष्ण तिचे सर्वस्व असल्याचे समजावले. प्रिया हिने गुडगाव येथील भारतातील पहिल्या १० विद्यापिठांपैकी एक असलेल्या विद्यापिठातून ‘एम्.बी.ए.’ची पदवी प्राप्त केली होती आणि चंदीगढ येथे ती शासकीय अधिकारी म्हणून नोकरी करत होती. प्रिया हिने तिचे संपूर्ण आयुष्य श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अत्यंत भावपूर्ण स्थितीत हा विवाह केला.

संपादकीय भूमिका

  • आता पुरोगाम्यांना याविषयी पोटशूळ उठून त्यांनी यावर टीका केल्यास आश्‍चर्य वाटू नये !