काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांची विधानसभेत मागणी
रावेर (जिल्हा जळगाव) – मध्यप्रदेश येथून रावेरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधपणे गोवंशीयांची वाहतूक चालू आहे. अनेक वेळा गोतस्करी करणार्यांची वाहने पकडली जातात; मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे गोवंशीयांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे. याविषयी काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे. या वेळी आमदार चौधरी यांनी रावेर तालुक्यातील पालमार्गे काही मासांपूर्वी सुकी नदीमध्ये फेकलेल्या २३ मृत गोवंशीयांचा संदर्भ देत यातील गोतस्करांवर कठोर कावाई करण्याचीही मागणी केली.
जळगाव येथे २६ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत मुख्य वक्ते असलेले ‘सुदर्शन न्युज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी रावेर येथील गोतस्करी आणि गोरक्षकांवरील आक्रमणे यांविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती.