भंडारा येथे प्रवाशांकडून विनयभंग होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास करणे सोडून दिले !

जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव येथील शालेय विद्यार्थिनी बसमधून प्रवास करत असतांना बसमधील काही प्रवाशांकडून विद्यार्थिनींना स्पर्श करून त्यांचा विनयभंग करण्यात येत आहे, तसेच हातवारे करून छेड काढण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत.

पुणे महापालिका मुख्य इमारतीतील महिलांसाठी स्थापन झालेला हिरकणी कक्ष गेल्या काही मासांपासून गायब !

हिरकणी कक्ष सर्व सुविधांनिशी तातडीने चालू करण्याचे ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांचे प्रशासनास निवेदन

शहापूर तालुक्यात काही गावांत भूकंपाचे हादरे

मागील ६ ते ७ दिवसांपासून शहापूर तालुक्यातील सोगाव, वेहळोली, कानडी, कानवे, चेरवली आणि किन्हवली या गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसल्याचे जाणवत आहे.

बॉलीवूड आणि हवाला !

अनेक अभिनेते हे अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, तसेच अन्य व्यसनांच्या अधीन आहेत. काही जण तर राष्ट्रविघातक कारवायांना पाठिंबा देतात. अशांनी पांघरलेला मानवतावाद, सुधारणावाद यांचा बुरखा फाडणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे अशांना आदर्श मानणार्‍या तरुणांनी लक्षात घ्यायला हवे.

डोंबिवली येथे मोकाट बैलाने ढुशी मारल्याने वृद्धाचा मृत्यू

बर्‍याचदा मोकाट जनावरे रस्त्यांवर बसलेली असतात, त्यामुळे वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या घटनेनंतर मोकाट जनावरांच्या मालकांवर होणार्‍या कारवाईचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

१ लाख रुपयांची लाच मागणार्‍या ग्रामविकास अधिकार्‍याला अटक !

शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगातून केलेल्या कामाचे देयक रक्कम खात्यात जमा करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून अटक केली.

ठाणे रेल्वेस्थानकात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

समाजाला धर्मशिक्षण नसल्यामुळे समाजाची नीतीमत्ता रसातळाला गेली आहे. सर्वत्र स्त्रियांवर होणारे विविध प्रकारचे अत्याचार कायमस्वरूपी थांबण्यासाठी रामराज्यासम आदर्श राज्यच हवे !

गीता जयंतीच्या निमित्ताने श्री मलंगगड ‘भाल गुरुकुल’ येथे रक्तदान शिबिर !

श्री मलंगगड भाविक कल्याणकारी प्रतिष्ठानच्या वतीने ‘गीता जयंती’च्या निमित्ताने ४ डिसेंबर २०२२ या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत श्री मलंग रोड येथील ‘भाल गुरुकुल’ या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हा भारत आहे कि पाकिस्तान ?

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘अय्यप्पा स्वामी मोहनस’ शाळेत इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्याला ‘अय्यप्पा माळ’ घातल्यामुळे शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. वर्गशिक्षकाने त्याला शिवीगाळ केली आणि माळ काढण्यास भाग पाडले.

भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत आणि त्यामागील कारणे

मागील लेखात आपण ‘काही विशिष्ट शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य पद्धतीने कसे लिहावेत आणि ते तसे का लिहावेत ?’, याविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात आणखी काही शब्द पाहू.