ठाणे रेल्वेस्थानकात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

ठाणे १ डिसेंबर (वार्ता.) – ठाणे रेल्वेस्थानक येथील फलाट क्रमांक १० (अ) वर एका प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दीपक शाहू (वय २० वर्षे) याला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

समाजाला धर्मशिक्षण नसल्यामुळे समाजाची नीतीमत्ता रसातळाला गेली आहे. सर्वत्र स्त्रियांवर होणारे विविध प्रकारचे अत्याचार कायमस्वरूपी थांबण्यासाठी रामराज्यासम आदर्श राज्यच हवे !