डोंबिवली येथे मोकाट बैलाने ढुशी मारल्याने वृद्धाचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, १ डिसेंबर (वार्ता.) – डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर परिसरातून रस्त्याने चाललेले शिवराम धोत्रे (वय ६८ वर्षे) यांना एका मोकाट बैलाने जोरात ढुशी मारली. त्याच वेळी बाजूने जाणार्‍या बसखाली ते फेकले गेले. भरधाव वेगात असलेली बस त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बर्‍याचदा मोकाट जनावरे रस्त्यांवर बसलेली असतात, त्यामुळे वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या घटनेनंतर मोकाट जनावरांच्या मालकांवर होणार्‍या कारवाईचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.