मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगातून केलेल्या कामाचे देयक रक्कम खात्यात जमा करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून अटक केली. बोराळे (तालुका मंगळवेढा) येथील गोपीचंद (दादा) गवळी असे लाच मागणार्या ग्रामविकास अधिकार्याचे नाव आहे.
तक्रारदाराचे मित्र ठेकेदार असून ठेकेदाराने बोराळे येथे शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे, तसेच जिल्हापरिषद शेष निधी अंतर्गत केलेल्या कामाच्या देयकासंदर्भात तक्रारदार पाठपुरावा करत होते. या कामाच्या देयकाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाली होती. या वेळी गोपीचंद गवळी यांनी तक्रारदाराकडे मोबदला म्हणून १ लाख रुपयांची मागणी करून त्यातील पहिला हप्ता ५० सहस्र रुपये मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचारग्रस्त महाराष्ट्र ! |