धर्मांध मुसलमानाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणा; मात्र छत्रपती शिवरायांच्या जयघोषावर मौन !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेच्या विरोधात धरणे आंदोलन करतांना त्यांच्या समर्थकांनी घोषणा दिल्या. एका मुसलमानाने मात्र ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ ही घोषणा देण्याचे टाळले. सामाजिक माध्यमांवरून या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

धरणे आंदोलन करतांना आव्हाड यांच्या समर्थकांनी ‘हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा’, ‘तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं’, या घोषणा दिल्या. त्या वेळी सदर मुसलमान घोषणा देत होता. हिंदु समर्थकांनी ‘जय जय जय जय जय भवानी, जय जय जय जय जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ या घोषणा दिल्यावर मुसलमान जयघोष न करता गप्प राहिला.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जयघोष करतांनाचे छायाचित्र प्रसारित झाले होते. यामध्ये अजित पवार, धनंजय मुंडे आदी नेते हात उंचावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत असल्याचे दिसत आहे; मात्र या वेळी त्यामध्ये उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक जयघोष न करता तसेच उभे होते.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, तुम्ही अफझलखानाची कबर आणि दर्गे यांपुढे डोके टेकवत असलात, तरी धर्मांध मुसलमान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून तरी नतमस्तक होतात का ? याचा वेळीच विचार करा !