महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

हिंदु युवतींना नियोजनपूर्वक फसवून ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यासाठी ३-३ मास प्रयत्न करून युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जात आहे. माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातही हे समोर आले होते आणि आताही पुढे येत आहे.

नागपूर अपहरण प्रकरणातील ३ पसार आरोपींना अटक !

कळमना येथील चिखली झोपडपट्टीतून १० नोव्हेंबरला ८ मासांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. १२ नोव्हेंबरच्या रात्री या प्रकरणातील पसार आरोपी योगेंद्र प्रजापती आणि त्याची पत्नी रिटा प्रजापती यांना भोपाळ येथून रेल्वेने राजस्थानातील कोटा येथे पळून जात असतांना..

कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न !

नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेच्या कालावधीत येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एकूण ३ कोटी २० लाख ५९ सहस्र ५४२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

अमरावती येथे खासगी रुग्णालयातून आरोपीचे पलायन

गुन्हेगारांवर लक्ष न ठेवणार्‍या कर्तव्यच्युत पोलिसांचे केवळ स्थानांतर करून त्यांच्या वृत्तीत काय फरक पडणार ? अन्य ठिकाणीही ते असे वर्तन करणार नाहीत कशावरून ? त्यामुळे अशांना बडतर्फच करायला हवे !

इंदापूर (पुणे) येथील वाढत्या गोहत्या रोखण्यासाठी गोरक्षकांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन

इंदापूर येथील वाढत्या गोहत्या रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य करावे, अशा आशयाचे निवेदन गोरक्षक श्री. ऋषिकेश कामथे यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच मुंबईचे पोलीस महासंचालक यांना देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये १५ नोव्हेंबर या दिवशी पंडित नथुराम गोडसे आदरांजली सभा !

हिंदु सभेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी दादर (पश्चिम) येथील पाटील मारुति मंदिराच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता ‘पंडित नथुराम गोडसे आदरांजली सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेला हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर ‘भारताच्या फाळणीचे दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

अफझलखानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

शासनाने केले ते योग्यच केले. त्यामुळे याविषयी कुणी अपसमज करून घेण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण जगाला आणि भावी पिढीला कळला पाहिजे. यासाठी अफझलखानाची कबर पर्यटकांसाठी खुली करावी, अशी मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या ‘क्लस्टर एस्.टी.पी.’ प्रकल्पाविषयी समन्वयाने नियोजन करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नवनिर्मित इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्त्वाचे रस्ते विकास, पाणीपुरवठा, तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील.

जागतिक हवामान पालट परिषदेचा फार्स !

जागतिक हवामान पालट आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांवर शाश्वत उपाय म्हणजे हिंदु धर्म-संस्कृती यांचे पालन ! जगाच्या दृष्टीने विचार केल्यास जर जागतिक स्तरावर पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल, तर हिंदु धर्मातील तत्त्वांचे आचरण करण्याकडेच आपल्याला वळावे लागेल !

मुसलमानांना मंदिरातील इफ्तार पार्टी कशी चालते ?

एन्.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीचे पत्रकार नसीम अहमद आगर्‍यातील मनकामेश्वर मंदिरातील भंडार्‍यात सहभागी झाले आणि त्यांनी कपाळावर टिळा लावला, तसेच गळ्यात भगवे उपरणे घातले. त्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून नसीम यांना विरोध होऊ लागला आहे.