नगर – कोठला येथील शहा स्टील फर्निचर शेजारील, हॉटेल कुरेशी पाठीमागे, पत्र्याच्या शेडमध्ये मोसीन कुरेशी हा गोवंशियांना डांबून ठेवून त्यांची कत्तल करून गोमांसाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यानुसार कोठला परिसरात चालू असलेल्या पशूवधगृहावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून २ लाख ३९ सहस्र ८५० रुपये मूल्याचे १ सहस्र १०० किलो गोमांस, २ जिवंत जनावरे आणि साधने जप्त केली. या प्रकरणी अंमलदार पवार यांच्या तक्रारीवरून मोसीन कुरेशी, सलीम कुरेशी, राजीक कुरेशी या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकागोवंश हत्याबंदी कायदा असूनही तो धाब्यावर बसवून दिवसरात्र होणार्या गोहत्या कधी थांबणार ? कारवाया करूनही या उद्दाम प्रवृत्तीच्या कसायांना काहीच फरक पडत नाही. त्यासाठी प्रत्येक राज्यात योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेतृत्व हवे. तरच गोरक्षा शक्य आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |