नवी मुंबई येथे ३ लाखांची लाच मागणारी महिला तहसीलदार पोलिसांच्या कह्यात !

दलाल अटकेत

अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी

नवी मुंबई – भूमीचा सातबारा नोंद करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणार्‍या अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

 (सौजन्य : Bhaskar Bhushan Live)

दळवी यांच्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारणारा राकेश चव्हाण या दलालालाही अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

महिलाही भ्रष्टाचारात पुढे असणे हे महाराष्ट्राला लज्जास्पद !