‘चुकांमुळे साधनेची हानी होऊ नये’, यासाठी चुका स्वीकारण्यासाठी साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यामुळे त्यांना जाणवलेले सकारात्मक पालट !

भगवंताने सर्व साधकांच्या साधनेची होणारी हानी भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून लक्षात आणून दिली आणि तितक्याच प्रेमाने खंत निर्माण होण्यासाठी दिशाही दिली. त्यानुसार साधकांनी स्वतःच्या चुकांचा अभ्यास करून केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.

‘गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) ज्या दिवशी स्वतःच्या जीवनात आले, तोच स्वतःचा जन्मदिवस आहे’, असा अपार भाव असलेल्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे) !

‘साधकांच्या आयुष्यात ज्या गोष्टींविषयी कळणे आवश्यक असते, त्या गोष्टी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच समजतात. त्यामुळे साधकांनी कुठल्याच गोष्टीचा विचार न करता सर्व भार गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) सोपवून केवळ साधनेचे प्रयत्न करायला हवेत’, असे पू. आईकडून मला शिकायला मिळाले.’

असा अनुभवला आम्ही संतांच्या देहत्यागाचा आनंद सोहळा…!

३०.१०.२०२२ या दिवशी दुपारी ४.२७ वाजता सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांनी देहत्याग केला. त्या वेळी ‘संतांचा देहत्याग हा आनंद सोहळा असतो’, याची प्रचीती आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘याची देही, याची डोळां’ आली. या आनंद सोहळ्याचे वर्णन आणि त्या वेळी आम्हाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या अस्थिविसर्जनानंतर वाईट शक्तींनी केलेली आक्रमणे आणि भगवंताची अनुभवलेली कृपा !

‘२.११.२०२२ या दिवशी पू. पद्माकर होनप यांचे अस्थिविसर्जन झाले. विधी झाल्यावर मी दुचाकीने रामनाथी आश्रमात आले आणि दुचाकी लावत असतांना माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊन मी पडले अन् दुचाकी माझ्या अंगावर पडली. त्या वेळी मला काहीच समजले नाही.

(कै.) पू. पद्माकर होनपकाका यांच्या देहत्यागानंतर श्री. रामानंद परब यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘पू. होनपकाका यांच्या खोलीत गेल्यावर मला पुष्कळच शांत वाटत होते. ‘आपण एका पोकळीत आहोत’, असे मला जाणवले. ‘वातावरणात पुष्कळ मोठ्या प्रमाणात आनंदाचे प्रक्षेपण होत आहे’, असेही मला जाणवले.