ऑक्टोबर मासामध्ये कोणती लागवड करावी ?
या मासामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानंतर सर्व हिवाळी पिकांची लागवड चालू करता येते. यामध्ये मुख्यत्वे सर्व प्रकारच्या पालेभाज्या; बीट, गाजर, बटाटे यांसारखे कंद; वाटाणे, पावटे यांसारख्या शेंगभाज्या लावता येतात. कांदा-लसूण यांचीही लागवड करता येते.