विजयादशमीचे रहस्य !

नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi

उद्या ५ ऑक्टोबर २०२२ या दिवशी ‘विजयादशमी (दसरा)’ आहे. त्या निमित्ताने…

श्रीराम

‘आश्विन शुक्ल दशमी हा दिवस सर्व भारतात ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतियांच्या मूर्तीमंत पराक्रमांचा इतिहासच ‘विजयादशमी’त दिसून येतो. हिंदु समाजातील चारही वर्णांच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.


🌸 धर्मसंवाद : ▫️ विजयादशमी : इतिहास और धार्मिक कृति का शास्त्र ! 🌸

(सौजन्य : सनातन संस्था एवं हिंदु जनजागृती समिती)


विद्येची आराधना आणि जोपासना करणारा ब्राह्मण वर्ग याच दिवशी सरस्वतीची पूजा करून ज्ञानाचे पाठ घेत असतो. आपल्या अद्वितीय बाहुबळाने पराक्रम करणारे क्षत्रिय वीर विजयादशमीलाच स्वतःच्या शस्त्रास्त्रांचे पूजन करून देशरक्षणासाठी आणि शत्रूंचा निःपात करण्यासाठी सीमोल्लंघन करत असतात. नवीन धन निर्माण करणे, हे ज्या वैश्यांचे कार्य त्यांच्याकडून आणि याच वेळी शेतातून नवीन नवीन धान्ये निर्माण झालेली असल्यामुळे सृष्टीस ‘सुजलाम् सुफलाम्’ असे स्वरूप प्राप्त झालेले असते.

आपट्याचे पान

शत्रूपक्षाचा पराभव करून आणलेली धनदौलत स्वकियांना या दिवशी वाटण्याची प्रथा आहे. याचा उगम रामायणाच्या पाचव्या सर्गात सापडतो. आपल्या गुरुंना १४ कोटी सुवर्ण-मुद्रांची दक्षिणा देता यावी; म्हणून कौत्स नावाचा ब्राह्मणपुत्र रघुराजाकडे आला. त्याच वेळी रघुराजाने नुकताच विश्वजित यज्ञ केला असल्यामुळे तो दरिद्री झाला होता; पण आलेल्या याचकास विन्मुख न पाठवता रघुने कुबेरावर स्वारी करून त्याच्याकडे सुवर्ण मुद्रांची मागणी केली. कुबेराने भयभीत होऊन अयोध्या नगराबाहेर एका शमीच्या वृक्षावर सुवर्णवृष्टी केली. त्यांतील १४ कोटी सुवर्णमुद्रा कौत्सास मिळाल्या. उरलेले सुवर्ण रघुराजाने नागरिकांना वाटले. हा दिवसही आश्विन शुक्ल दशमी हाच होता. या वेळेपासून सोने लुटण्याची प्रथा रूढ झाली असावी. असे म्हणतात की, याच दिवशी प्रभु रामचंद्रांनी रावणाचा नाश केला. अशा प्रकारे हा दिवस पराक्रमाचा आणि विद्यार्जनाचा म्हणून भारतियांना अत्यंत उत्साहदायक वाटतो. ३ – ४ मास पावसाळ्यांत विश्रांती घेतल्यानंतर मराठ्यांच्या फौजा याच दिवशी शत्रूचा पराभव करण्यासाठी ‘सीमोल्लंघन’ करत असत.’

(साभार : ‘दिनविशेष’)


दसरा (विजयादशमी) संदर्भात अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/615016.html