मध्यप्रदेशात अवैध फटाका गोदामात स्फोट; ३ ठार !

प्रतिकात्मक छायाचित्र

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्याच्या मुरैना जिल्ह्यात फटाक्यांच्या अवैध गोदामात झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की, ज्या इमारतीत फटाके बनवले जात होते, ती इमारत पूर्णपणे कोसळली. यामध्ये चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुरैना जिल्ह्यातील बनमोर शहराजवळ असलेल्या जैतपूर गावात ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या स्फोटात संपूर्ण इमारत जळून खाक झाली आणि ७ जण गंभीर भाजले गेले. त्यातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य ४ जणांवर मुरैना जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.