इंडोनेशियाची राजधानी जकार्तात लागलेल्या आगीत संपूर्ण मशीद कोसळली !

प्रतिकात्मक छायाचित्र

जकार्ता (इंडोनेशिया) – येथील ‘इस्लामिक सेंटर ग्रँड मशिदी’च्या घुमटात १९ ऑक्टोबर या दिवशी भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, घुमटासह संपूर्ण मशीद कोसळली. ‘जकार्ता ग्लोब’ या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. यामध्ये मशीद कोसळण्यापूर्वी घुमटातून ज्वाळा आणि धुराचे लोट उठतांना दिसत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या वेळी मशिदीच्या दुरुस्तीचे काम चालू होते.