मुंबई येथे ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त !

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !

मुंबई – अन्न आणि औषध प्रशासनाने (एफ्.डी.ए.ने) मुंबईतील चिंचबंदर परिसरातून ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त केले असून या तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ‘तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल’, असे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत २ लाख ९९ सहस्र ९० रुपये इतकी आहे.

अधिकार्‍यांनी चिंचबंदर येथील श्रीनाथजी इमारतीतील ‘मेसर्स ऋषभ शुद्ध घी’ भंडारवर टाकलेल्या धाडीत अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तुपाच्या दर्जाविषयीही संशय होता. त्यानुसार त्यांनी वरील कारवाई केली.

संपादकीय भूमिका

सणासुदीच्या काळात जनतेला चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचे सोडून त्यात भेसळ करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !