पी.एफ्.आय.च्या पनवेल येथील सचिवासह अन्य तिघांना अटक !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !

पनवेल – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने येथे १९ ऑक्टोबरला जिहादी आतंकवादी संघटना पी.एफ्.आय.च्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या) सचिवासह अन्य तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी पथकाकडून अधिक अन्वेषण करण्यात येत आहे.

पनवेलमध्ये पी.एफ्.आय. संघटनेचा कापडी फलक लावून ते सभा घेत असल्याचे आतंकवादविरोधी पथकाला आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संघटनेवर बंदी घातल्यानंतरही पी.एफ्.आय. संघटनेच्या जिहादी कारवाया पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली या जिहादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.