‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून संबंधित संस्थांची चौकशी करावी !

सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी. उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशी मागणी मुसलमान करत आहेत.

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शिक्षकांसाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

या वेळी विश्वविद्यालयाच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘तणाव म्हणजे काय ?, तणावाची कारणे कोणती ?, तणावामुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो ? आणि त्यामुळे विविध प्रकारचे शारीरिक अन् मानसिक आजार कसे उत्पन्न होतात ?’, यांविषयी मार्गदर्शन केले.

हिंदूंनी कर्महिंदु बनण्यास प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

आपण भाग्यवान आहोत की, आम्ही हिंदु धर्मात जन्म घेतला आहे; परंतु या जन्माचे सार्थक करण्यासाठी आपल्याला कर्मानेही हिंदु बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नसल्याने हिंदु युवक पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण करत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करणारे बडतर्फ ११८ एस्.टी. कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी आंदोलन केल्याने बडतर्फ करण्यात आलेल्या ११८ एस्.टी. कर्मचार्‍यांना १३ ऑक्टोबरपासून सेवेत रुजू करून घेण्यात आले. मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी निर्णय घेतला होता.

शेतकरी साहाय्यापासून वंचित राहिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील !

आतापर्यंत पिकांची हानी झाल्यानंतर हानीभरपाई देणार्‍या विमा आस्थापनांकडून शेतकर्‍यांची अनेक वेळा फसवणूक करण्यात आली आहे. तरीही सरकार आस्थापनांच्या व्यवस्थापकांवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे या आस्थापनांचे फावते आणि ते वारंवार शेतकर्‍यांची फसवणूक करतात.

भायखळा (मुंबई) येथे ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत ‘शिवसेना शिवसेना’ हे गाणे वाजवले !

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ‘आतंकवाद्यांशी लढतांना शहीद झालेले लष्करातील औरंगजेबसारखे जवान आमचे बंधू आहेत’, असे म्हटले होते. या दसरा मेळाव्याला अनेक मुसलमान शिवसैनिकांची उपस्थिती होती.

मेट्रो मार्गिकेचे काम करतांना खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे दायित्व मेट्रोचे !

मेट्रो मार्गिका आणि स्थानक यांचे काम करतांना खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे दायित्व महामेट्रोचे आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक आणि मेट्रो मार्गिका यांचे काम चालू असलेल्या ठिकाणचे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रमकुमार यांनी महामेट्रोला दिले..

मढ (मुंबई) येथील ४ मासांत सिमेंट काँक्रिटची पर्जन्य जलवाहिनी ढासळली

४ मासांत जलवाहिनी ढासळते, यावरूनच तिच्या बांधकामाचा दर्जा किती निकृष्ट होता, याची कल्पना येते !

सणांच्या काळात प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आदेश !

सणांच्या काळामध्ये प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी वाहनांना चाप लावण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेश काढला आहे. अवाच्या सवा दर आकारून लूट करत असल्यास तक्रार प्रविष्ट करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांकही घोषित केला आहे.

हिंगोली येथे तांदूळ आणि गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेतांना जप्त !

येथे तालुक्यातून तांदूळ आणि गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना जप्त करण्यात आला. ३०० क्विंटल तांदूळ आणि ३० क्विंटल गहू कह्यात घेण्यात आला आहे. त्यांचे मूल्य ६ लाख ३७ सहस्र रुपये आहे.