मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी आंदोलन केल्याने बडतर्फ करण्यात आलेल्या ११८ एस्.टी. कर्मचार्यांना १३ ऑक्टोबरपासून सेवेत रुजू करून घेण्यात आले. मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी निर्णय घेतला होता.
विलिनीकरणासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एस्.टी. कर्मचार्यांनी संप केला होता. महविकास आघाडी सरकार या मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय न देता संपकरी कर्मचार्यांना निलंबित करणे, बडतर्फ करणे अशा कारवाया करत होते. तत्कालीन सरकारचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार हेही बघ्याची भूमिका घेत होते. परिणामी संतप्त कर्मचार्यांनी पवार यांच्या निवास्थानाजवळ लोकशाही मार्गाने आंदोलन केले. त्या वेळी सरकारने पोलीस बळाचा वापर करून अनेक कर्मचार्यांना अटक केली होती. तसेच ११८ कर्मचार्यांना बडतर्फ केले होते.