हिंगोली – येथे तालुक्यातून तांदूळ आणि गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना जप्त करण्यात आला. ३०० क्विंटल तांदूळ आणि ३० क्विंटल गहू कह्यात घेण्यात आला आहे. त्यांचे मूल्य ६ लाख ३७ सहस्र रुपये आहे. या प्रकरणी दोघांना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. पोलिसांनी एक ट्रक आणि एक बोलेरो जीप कह्यात घेतली आहे. (पोलिसांनी समस्येचे समूळ उच्चाटन करावे. – संपादक)