मढ (मुंबई) – येथे मे २०२२ मध्ये पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आलेली सिमेंट काँक्रिटची पर्जन्य जलवाहिनी ४ मासांत ढासळली. त्यामुळे तिचे बांधकाम तोडावे लागले. (४ मासांत जलवाहिनी ढासळते, यावरूनच तिच्या बांधकामाचा दर्जा किती निकृष्ट होता, याची कल्पना येते ! – संपादक) जलवाहिनी तोडावी लागल्याने या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पैशांचा अपव्यय झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने केली आहे. ‘संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, त्याची देयके थांबवावीत, देयके दिली असल्यास पैसे वसूल करावेत, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणीही केली आहे.