भायखळा (मुंबई) येथे ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत ‘शिवसेना शिवसेना’ हे गाणे वाजवले !

भायखळा (मुंबई) येथे ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत ‘शिवसेना शिवसेना’ हे गाणे वाजवले

मुंबई – भायखळा येथे ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत ‘शिवसेना शिवसेना’ हे गाणे वाजवण्यात आले, तसेच या मिरवणुकीत ताजियावर भगव्या रंगातील महाराष्ट्राची प्रतिमाही होती. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत आहे.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ‘आतंकवाद्यांशी लढतांना शहीद झालेले लष्करातील औरंगजेबसारखे जवान आमचे बंधू आहेत’, असे म्हटले होते. या दसरा मेळाव्याला अनेक मुसलमान शिवसैनिकांची उपस्थिती होती.

भाजपने सध्या हिंदुत्वाची भूमिका प्रखर केली आहे. त्यामुळे अंधेरी येथील पोटनिवडणुकीत सर्वसमावेशक भूमिका घेतलेल्या शिवसेनेला वंचित बहुजन आघाडी आणि एम्.आय.एम्.ने उमेदवार न उतरवल्यास मुसलमानांची मते मिळण्याची शक्यता वाढली आहे.