(म्हणे) ‘राजराजा चोल यांच्या काळामध्ये हिंदु नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता !’  

अभिनेते कमल हसन यांचा जावईशोध !

अभिनेते कमल हसन

चेन्नई (तमिळनाडू) – राजराजा चोल यांच्या काळामध्ये ‘हिंदु’ नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता. तेव्हा केवळ वैष्णवम्, शिवम् और समानम् नावाचे धर्म होते. हिंदु शब्द इंग्रजांनी आणला, असे विधान दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी केले आहे. नुकताच चोल वंशीय राजावर आधारित तमिळ चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन-१’ प्रदर्शित झाला आहे. त्या वेळी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध दिग्दर्शक मणीरत्नम् यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कमल हसन यांच्या या विधानानंतर त्यावर वाद निर्माण झाला आहे.

कमल हसन यांच्यापूर्वी तमिळ चित्रपटांचे दिग्दर्शक वेत्रिमारन यांनीही ‘चोल राजा हिंदू नव्हते’, असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, आमच्या प्रतीकांना सातत्याने आमच्याकडून हिरावून घेतले जात आहे. त्यांचे भगवेकरण केले जात आहे. चोल राजांना हिंदु राजा म्हटले जात आहे.

चोल राजा हिंदूच होते ! – भाजप

भाजपचे नेते एच्. राजा यांनी या विधानांचा विरोध केला आहे. ते म्हणाले की, राजराजा चोल हे हिंदु राजे होते. मला वेत्रिमारन् यांच्या प्रमाणे इतिहासाची पुष्कळ माहिती आहे, असे नाही, तरी राजराजा चोल यांनी २ चर्च आणि मशिदी बांधल्या होत्या.

संपादकीय भूमिका

  • कमल हसन स्वतःला हिंदु समजतात का ? हाच मुळात प्रश्न आहे ! तमिळनाडूतील अनेक जण स्वतःला हिंदु न समजता द्रविड समजत आहेत. त्यांना हिंदु शब्दाचा अर्थही ठाऊक नसल्याने ते अशा प्रकारे स्वतःची फसवणूक करून घेत आहेत !
  • चोल वंशीय राजांनीच भारतीय संस्कृती तमिळनाडूच नव्हे, तर व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया आदी दक्षिण आशियातील देशांत सत्ता स्थापन करून वाढवली ! आजही तेथे मोठ्या संख्येने हिंदू आहेत !