उद्योजक मुकेश अंबानी यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला बिहारमधून अटक !

मुंबई – रिलायंस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला बिहारमध्ये अटक करण्यात आली आहे. राकेश कुमार मिश्रा असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राकेश याने रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयामध्ये दूरभाष करून धमकी दिली होती.

५ ऑक्टोबरच्या दुपारी १ वाजता रिलायंस फाउंडेशनच्या सर एच्.एन्. रुग्णालयाच्या दूरभाषवर मिश्रा याने संपर्क करून रुग्णालय बाँबने उडवून देण्याची आणि अंबानी दांपत्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.