४६ सहस्र पुस्तकांचे केले प्रकाशन !
भिवानी (हरियाणा) – हरियाणा शैक्षणिक बोर्ड राज्यातील सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना वैदिक गणित शिकवणार आहे. त्यासाठी १८ लाख रुपये खर्च करून ४६ सहस्र पुस्तके प्रकाशित केली आहेत. हरियाणा विद्यालय शैक्षणिक बोर्डाचे अध्यक्ष जगबीर सिंह यांनी यासंदर्भात सांगितले की, शैक्षणिक बोर्डाच्या वैदिक गणिताच्या अभ्यासक्रमाला हरियाणा विद्यालय शिक्षा निदेशालयाकडून अजूनपर्यंत स्वीकृती मिळाली नसली, तरी बोर्डाच्या संचालक मंडळाने यास अनुमती दिली आहे. सिंह म्हणाले की, वैदिक गणितामुळे विद्यार्थ्यांना पुष्कळ लाभ होणार आहे.
वैदिक गणित शिकवण्यासाठी राज्यातील ११९ खंडांतील प्रत्येक खंडात तीन शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत नववी ते बारावी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकवण्यात येईल. त्यामुळे त्यांना गुणाकार, भागाकार, तसेच अंकमोजणी करण्यासाठी कागद-लेखणीची आवश्यकता रहाणार नाही, तर ते बोटांवरच सर्व गणना करू शकतील, असेही सिंह म्हणाले.
संपादकीय भूमिकाहरियाणा शैक्षणिक बोर्डाचा अभिनंदनीय निर्णय ! आता अन्य भाजपशासित प्रदेशांनीही अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वैदिक म्हणजेच प्राचीन गणिताचे धडे देऊन स्पर्धात्मक युगामध्ये यश संपादन करण्यासाठी साहाय्य करावे, असेच हिंदूंना वाटते ! |