काँग्रेसचे नेते उदित राज यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘चमचा’ असा उल्लेख

भाजपकडून टीका

उदित राज आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी देहली – काँग्रेसचे नेते उदित राज यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी ‘कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारखा राष्ट्रपती मिळू नये. चमचेगिरीचीही मर्यादा असते’, असे विधान केले आहे. त्यामुळे उदित राज यांच्यावर टीका होत आहे.

द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच ‘देशातील ७० टक्के जनता गुजरातमधून येणारे मीठ खाते’, असे म्हटले होते. त्यावरून उदित राज यांनी टीका करतांना वरील विधान केले. भाजपने उदित राज यांच्यावर टीका करतांना ‘उदित राज यांची आदिवासी विरोधी मानसिकता दिसून येते’, असे म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही उदित राज यांच्यावर टीका करत क्षमा मागण्याची मागणी केली आहे.