हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटाला विरोध करू ! – महाराष्ट्र करणी सेना

महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंग

मुंबई – ‘टीआर्पी’ वाढवण्यासाठी ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये हिंदु धर्माची टिंगल करण्यात आली आहे. हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटाला महाराष्ट्रात विरोध करू, अशी चेतावणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी दिली आहे. या वेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे ‘आदिपुरुष’वर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.

याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये श्री. सेंगर यांनी म्हटले की, चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येकवेळी हिंदु धर्मालाच लक्ष्य का केले जाते ? इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मावर चित्रपट काढण्याची अन् त्यांचे विकृतीकरण करण्याचे कुणाचे धारिष्ट्य नाही. कुणी धार्मिक विषयावर चित्रपट काढत असेल, तर इतिहासतज्ञ आणि हिंदु धर्मपीठ यांच्याकडून अभिप्राय घेणे आवश्यक आहे.