बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या मंडपात कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मुसलमानाला अटक

ढाका (बांगलादेश) – ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावर एका मुसलमान व्यक्तीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या मुसलमानाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री दुर्गादेवीच्या मंडपात कुराण ठेवण्याचा प्रयत्न केल्यावरून त्याला रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

गेल्यावर्षी अशाच प्रकारे मंडपात कुराण ठेवून हिंदूंवर त्याचा अवमान केल्याचा आरोप मुसलमानांनी केला होता. त्यांनी त्यांनी घडवून आणलेल्या दंगलीत अनेक हिंदू ठार झाले होते, तसेच हिंदूंच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी करण्यात आली होती !