मोरबी (गुजरात) – येथे एका गरबा कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया यांचा सहभाग होता. त्यांनी येथे ‘अली मौला’ असे गीत गाण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि ते बंद करण्यास भाग पाडले. यानंतर रेशमिया यांनी तेथून काढता पाया घेतला. या संघटनांनी गरब्याच्या आयोजकांना ‘यापुढे धार्मिक भावना दुखावणारे गीत गायल्यास किंवा वाजवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगण्यास सिद्ध रहावे’, असा दम दिला.
#नवरात्रि: मोरबी में हिमेश रेशमिया ने अली मौला का #गरबा_पंडाल में गीत गाया वहा VHP #BajrangDal की टीम आई की तुरंत वहा से भाग निकला,आयोजक को आगाज किया अगली बार धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने वाले गीत बजाए तो परिणाम भुगतने तैयार रहना। @VHPGUJOFFICIAL @NeerajDoneria @vinod_bansal pic.twitter.com/vRO4jka3fu
— Bajrang Dal Gujarat (@Bajrangdal_Guj) October 3, 2022
संपादकीय भूमिका‘हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी कोणते गाणे गायचे ?’, हेही ठाऊक नसणारे हिंदु गायक ! रेशमिया यांची ही कृती म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव आणि आत्मघाती धर्मनिरपेक्षता याचेच दर्शक आहे ! |