भटिंडा (पंजाब) – येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या भिंतीवर ‘खलिस्तान झिंदाबाद, पाकिस्तान झिंदाबाद’ ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ आणि ‘सिख, मुस्लिम भाई-भाई’ अशा खलिस्तानच्या समर्थनार्थ आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी या घोषणा पुसून टाकल्या. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या घोषणेच्या मागे बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा हात असल्याचे या संघटनेचा अध्यक्ष गुरपतवंतसिंह पन्नू याने स्वतः असल्याचे एक व्हिडिओ प्रसारित करून सांगितले आहे. त्याने पुढे असेही म्हटले आहे की, येत्या २६ जनवरी २०२३ पासून पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी जनमत संग्रहाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
Pro-Khalistan slogans written on the walls of the forest department in Bhatinda. Anti-India and Pro Pakistan slogans were written by some unidentified person. Employees of the forest department were seen painting the slogans to hide them.@Gurpreet_Chhina shares more details pic.twitter.com/HaxyHTVy0M
— TIMES NOW (@TimesNow) October 2, 2022
संपादकीय भूमिका
|