पाकिस्तानमधील प्रसिद्ध पंजा साहिब गुरुद्वारामध्ये मुसलमान कलाकारांनी चपला घालून केला प्रवेश !

शिखांकडून विरोध

नवी देहली – पाकिस्तानच्या हसन अब्दाल भागातील पंजा साहिब गुरुद्वारामध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी काही मुसलमान कलाकार चपला घालून आणि डोके कापडाने न झाकता आत गेल्याने गुरुद्वाराचा अवमान झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुद्वारामध्ये जातांना डोके कापडाने झाकण्याची परंपरा आहे. भाजपचे नेते मनजिंदरसिंह सिरसा यांनी या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. सिरसा यांनी ‘अशा घटनेमुळे भारतातील शिखांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिखांच्या विरोधानंतर मुसलमान कलाकारांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले, ‘आम्ही तुमचे पाहुणे आहोत.’ यावर घटनेचे चित्रीकरण करणार्‍या शीख व्यक्तीने म्हटले की, पाहुण्यांनीही गुरुद्वारामध्ये येतांना मर्यादेमध्ये यावे, त्यांचे स्वागत आहे.

संपादकीय भूमिका

याविषयी ‘सिख-मुस्लिम भाई भाई’ म्हणणारे खलिस्तानवादी गप्प का ?