शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचाच !

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्हावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दावा केला आहे. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घोषित करू, नये अशी याचिका ठाकरे गटाने सर्वाेच्च न्यायालयात केली होती.

पोलीसदलाच्या आधुनिकीकरणाचा पुनर्प्रस्ताव केंद्रशासनाला पाठवण्यात येणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

लव्ह जिहादच्या प्रकरणांचा आढावा घेण्यासमवेत ही प्रकरणे कायमची बंद होण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित आहे !

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी !

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास त्यांचे दीर बाबा मिसाळ यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. दोघांच्याही भ्रमणभाषवर संदेश पाठवून २ ते ५ लाख रुपयांची मागणी केली आहे.

१० ऑक्टोबरला खासदार संजय राऊत यांच्या जामिनावर सुनावणी 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनावर पुढील सुनावणी १० ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने आणखी १३ दिवसांची वाढ केली आहे. २७ सप्टेंबर या दिवशीच्या सुनावणीत संजय राऊत यांची बाजू ऐकून घेण्यात आली आहे.

सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ या मोहिमेचा घटस्थापनेच्या दिवशी संतांच्या हस्ते शुभारंभ !

‘सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ या मोहिमेच्या अंतर्गत ‘नैसर्गिक पद्धतीने लागवड करून फळे, भाजीपाला कसा पिकवावा ?’, याविषयी जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अविरत कार्यरत असणारी हिंदु जनजागृती समिती सर्व हिंदूंसाठी आधारस्तंभ ! – ह.भ.प. श्यामसुंदर निचीत महाराज, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

मागील २० वर्षे सातत्याने केलेल्या जागृतीमुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी राज्यातीलच नव्हे, तर भारतभरातील हिंदू कृतीशील होत आहेत. अंधश्रद्धा कायद्याचा विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या खांद्याला खांदा लावून वारकरी संप्रदायाने पुढाकार घेऊन प्रयत्न केले.

कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने आणि प्रतिकात्मक पुतळा दहन

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निदर्शने करून पी.एफ्.आय.चा पुतळा जाळण्यात आला. याचसमवेत पाकिस्तानचाही झेंडा जाळण्यात आला. आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना निवेदन देण्यात आले.

हिजाब आंदोलन !

जगभरातील हिजाबविरोधी आंदोलनातून भारतातील धर्मांध मुसलमान धडा घेणार का ? हिजाबची बळजोरी करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची वेळ भारत सरकारने आणली आहे; परंतु हिजाबवर बंदी घालण्याचा विचार भारतातील मुसलमान करतील, अशी आशा करणे व्यर्थ आहे !

निधर्मीवादी आता गप्प का ?

हिंदु धर्मीय असलेली पत्नी विवाहानंतर इस्लामप्रमाणे आचरण करत नसल्यामुळे चेंबूर (मुंबई) येथील इक्बाल महमंद शेख या मुसलमान पतीने तिची भर रस्त्यामध्ये गळा चिरून हत्या केली.

रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण इत्यादी खात असाल, तर सावधान !

नेहमी रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण, बाकरवडी, शेव, चिवडा यांसारखा फराळ चालू आहे’, असे असूनही जर तुम्ही निरोगी असाल, तर ती तुमची पूर्वपुण्याईच ! परंतु ही पूर्वपुण्याई संपली की, चुकीच्या सवयींचे परिणाम रोगाच्या रूपाने दिसू लागतील !