सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ या मोहिमेचा घटस्थापनेच्या दिवशी संतांच्या हस्ते शुभारंभ !

शेवग्याचे रोप लावत असतांना पू. सदाशिव परांजपे आणि समवेत त्यांच्या पत्नी पू. (सौ.) शैलजा परांजपे

रामनाथी (फोंडा, गोवा) – ‘सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ या मोहिमेच्या अंतर्गत ‘नैसर्गिक पद्धतीने लागवड करून फळे, भाजीपाला कसा पिकवावा ?’, याविषयी जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर, म्हणजेच २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात विषमुक्त भाजीपाला लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या हस्ते भाजीपाला लावण्यासाठी बनवलेल्या वाफ्याचे आणि भूमातेचे हळदी-कुंकू वाहून पूजन करण्यात आले. त्यानंतर पू. सदाशिव परांजपे यांच्या हस्ते वाफ्यामध्ये शेवग्याचे रोप लावून लागवडीचा आरंभ करण्यात आला.