टी. राजा सिंह यांना न्याय मिळवून देण्यासाठी तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा प्रयत्न !

टी. राजा सिंह

सिकंदराबाद (तेलंगाणा) – टी. राजा सिंह यांना अटक केल्याच्या प्रकरणी ४ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीने जलाराम बाप्पा मंदिर परिसरात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत १८ संघटनांचे प्रतिनिधी आणि नेते सहभागी झाले होते. या बैठकीत तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश राज्यांतील प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात धरणे आयोजित करणे, गणेशोत्सव मंडपात टी. राजा सिंह यांच्या समर्थनार्थ फलक लावणे, दंडाला काळ्या फिती बांधणे, रिक्शा आणि दुचाकी यांवर निषेधाचे फलक लावणे, ‘मी राजा सिंह यांना समर्थन देतो आणि न्याय करा’, असे स्टिकर्स लावण्याचे ठरवण्यात आले. तसेच या वेळी राजा सिंह यांना धमकी देणारे काँग्रेस नेते राशिद खान, फिरोज खान, आयेशा फरहीन आणि शिरच्छेदाच्या घोषणा देणारे कलीमुद्दीन आणि इतर धर्मांध मुसलमान यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांत तक्रार करण्याचेही ठरवण्यात आले.

राजा सिंह यांना तेलंगाणा सरकारकडून न्याय मिळण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे राजा सिंह यांच्यावरील सर्व खटले शेजारील कर्नाटक, गोवा किंवा महाराष्ट्र या राज्यांकडे वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी करण्याचेही ठरले.