देहली येथून १ सहस्र २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त : दोघा अफगाणी नागरिकांना अटक  

अटक केलेल्या अफगाणी नागरिकांसह दिल्ली पोलीस

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने दोघा अफगाणी नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून ३१२.५ किलोग्राम मेथामफेटामाईन आणि १० किलोग्राम हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात १ सहस्र २०० कोटी रुपये किंमत आहे. हे अमली पदार्थ चेन्नईहून लक्ष्मणपुरी आणि तेथून देहली येथे पाठवण्यात आले होते.