बांगलादेशात हिंदूंच्या स्मशानभूमीच्या भिंती मुसलमानांनी पाडल्या !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारताच्या दौर्‍यावर आल्या आहेत. त्या भारतासमवेत विविध विषयानुरूप करार करत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आक्रमणे चालूच आहेत. आता बांगलादेशातील मुंशीगंजमधील हिंदूंच्या स्मशानभूमीवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून तेथील भिंती पाडल्या. या स्मशानभूमीचे बांधकाम थांबवावे, या मागणीसाठी मुसलमानांनी मोर्चेही काढले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत असतांना भारत त्याविषयी बांगलादेशाला जाब विचारतांना दिसत नाही. ‘बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौर्‍यावर आल्या असून त्यांना याविषयी जाब विचारण्याचे धाडस भारत दाखवणार का ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !