देहलीतील ‘राजपथ’चे नाव आता ‘कर्तव्यपथ’ !

कर्तव्यपथ

नवी देहली – देहलीतील प्रसिद्ध ‘राजपथ’चे नाव पालटून त्याचे ‘कर्तव्यपथ’ असे नामकरण केले जाणार आहे. इंडिया गेटवरील नेताजींचा पुतळा ते राष्ट्रपती भवन हा रस्ता ‘राजपथ’ या नावाने ओळखला जातो. प्रतिवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन संचलन याच रस्त्यावर होते. ब्रिटीश राजवटीच्या काळात या मार्गाचे नाव ‘किंग्जवे’ असे होते. स्वातंत्र्यानंतर त्याचाच अनुवाद करून ‘राजपथ’ असे मार्गाचे नामकरण करण्यात आले होते. याखेरीज देहलीतील प्रतिष्ठित भाग असलेल्या ल्यूटन्समधील ५ रस्त्यांची नावे पालटण्याची मागणी भाजपने देहली महापालिकेकडे केली आहे. अकबर रोड, तुघलक रोड ही नावे गुलामगिरीचे प्रतीक असून ती पालटण्याची मागणी भाजपकडून केली जाते. (अशी मागणी करण्याची वेळ कुणावर येऊ नये. स्वातंत्र्यानंतरही मार्गांना असलेली इस्लामी आक्रमकांची नावे न पालटणारे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत ! – संपादक)