अवैध फलकबाजीला आळा कधी ?

लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी केल्यास त्यांना फलकांद्वारे जाहिरातबाजी करावी लागणार नाही, हे नक्की ! हिंदु राष्ट्रात प्रामाणिक, जनतेचे हित साधणारे आणि निःस्वार्थी लोकप्रतिनिधी असतील. त्यामुळे अवैध फलकबाजी निश्चितच नसेल !

अमरावती येथे दोन ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू

अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील ४ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हे ट्रक लोखंडी गज (बार) घेऊन जात होते.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍यांनी स्वस्त धान्यावरील अधिकार सोडावा !

आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍यांनी स्वत:हून पुढे येऊन स्वत:ची शिधापत्रिका पालटून पांढरी शिधापत्रिका घ्यावी. पडताळणीमध्ये तसे न आढळल्यास फौजदारी गुन्हे नोंद करण्यात येतील, अशी चेतावणी पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.

संबंधितांना कारागृहात टाका ! 

प्रसिद्ध साप्ताहिक ‘द वीक’ने भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अत्यंत अश्लाघ्य चित्र प्रसिद्ध केले आहे. याविरोधात भाजपचे नेते प्रकाश शर्मा यांनी कानपूरमध्ये तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

पूर्व आशियातील युक्रेन म्हणजेच तैवान आणि चीन-अमेरिका यांच्यातील वाढता संघर्ष

अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून अमेरिका आणि चीन या देशांमधील वातावरण तापले होते. चीनच्या धमक्यांमुळे हा दौरा रहित केला जाईल, अशी अटकळ होती; पण हा दौरा पूर्णपणे पार पडला आहे. या पार्श्वभूमीवर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

धर्माच्या आधारावर मुसलमान आणि ख्रिस्ती यांना निधीचे वाटप करणे, ही कोणती धर्मनिरपेक्षता ? – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

मागील ८ वर्षांत अल्पसंख्यांकांच्या विविध योजनांवर ३७ सहस्र ६६९ कोटी रुपये इतका निधी व्यय करण्यात आला आहे, तसेच राज्यांमध्ये अल्पसंख्यांकांवर व्यय करण्यात आलेला निधी त्यात मिळवल्यास हा निधी दुप्पट होईल.

काश्मीर खोर्‍यातील सायबर (माहिती-तंत्रज्ञान) जिहाद आणि त्यावरील उपाययोजना !

पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात चालू असलेल्या माहिती युद्धाला त्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देणे आवश्यक !

नियमित व्यायाम कराच !

व्यायाम करण्यासाठी कोणताही व्यय (खर्च) येत नाही. रोगनिवारणाचा असा विनामूल्य उपचार प्रत्येकाला करणे सहज शक्य असतांना केवळ ‘आळस’ या एका स्वभावदोषामुळे तो नियमित केला जात नाही. चला ! आजपासून नियमित व्यायाम करूया !

गुरूंवरील दृढ श्रद्धा, नम्रता आणि शरणागतभाव असलेले सासवड (पुणे) येथील श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

याप्रसंगी साधकांना जाणवलेली श्री. यशवंत वसानेकाकांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होण्यासाठी चैतन्यमय वाणीतून तळमळीने मार्गदर्शन करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरु  स्वाती खाडये प्रत्येक आठवड्याला युवा साधकांसाठी सत्संग घेतात. त्या सत्संगात युवा साधकांकडून आठवड्यात झालेले साधनेचे प्रयत्न जाणून घेतात.