आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍यांनी स्वस्त धान्यावरील अधिकार सोडावा !

पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांची सूचना

प्रातिनिधिक छायाचित्र

सोलापूर – सरकारी नोकरदार, बागायती शेती, खासगी क्षेत्रातील मोठे पगारदार या व्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍यांनी शिधापत्रिकेवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडावा. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍यांनी स्वत:हून पुढे येऊन स्वत:ची शिधापत्रिका पालटून पांढरी शिधापत्रिका घ्यावी. पडताळणीमध्ये तसे न आढळल्यास फौजदारी गुन्हे नोंद करण्यात येतील, अशी चेतावणी पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.

‘स्वस्त धान्य दुकानदार संघटने’च्या बैठकीत लांडगे यांनी धान्यवाटपाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी पूर्वी गरीब असलेल्या; मात्र आता आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍या शिधापत्रिकाधारकांची माहिती घेतली. या वेळी त्यांनी शिधावाटप दुकानदार आणि पुरवठा निरीक्षक यांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍यांची सूची सिद्ध करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना देणार असल्याचे सांगितले.